बॉडी बिल्डिंग ( Body Building) करणे ही श्रीमंत लोकांनी करण्यासारखी गोष्ट आहे. असा आपला समज असतो. कारण, बॉडी बिल्डिंग साठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यासाठी लागणाऱ्या व्यायाम व खाद्यासाठी भरपूर प्रमाणात पैसे मोजावे लागतात. मात्र केरळमधील एक व्यक्ती आहे ज्याने घरच्या घरीच एखाद्या आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर ला लाजवेल अशी शरीरयष्टी तयार केली आहे.
राज ठाकरेंना आज कोर्टात हजर रहावे लागणार; अजामीनपात्र वॉरंट जारी!
केरळमधील रिक्षाचालक राजा सेखरन असे या बॉडी बिल्डरचे नाव आहे. रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या राजा सेखरन ( Raja Sekhran) यांनी, नियमित व्यायाम करून वयाच्या चक्क 52 व्या वर्षी शरीरयष्टी कमावली आहे. राजा सेखरन आपल्या व्यायामाचे व्हिडीओ इंटरनेटवर शेअर करत असतात. विशेष म्हणजे राजा यांना कुठलाच जिम ट्रेनर नाही आहे.
बारामती-मुंबई रेल्वे सुरू होणार? सुप्रिया सुळे यांचे आश्वासन
राजा सेखरन दिवसभर रिक्षा चालवतात. मात्र आपल्या घरातच जुनं सामान गोळा करून त्यांनी एक लहानशी जीम तयार केली आहे. यामध्ये ते रोज सकाळी व्यायाम करतात. देशभरातील अनेक लोक त्यांना फॉलो करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या डाएट प्लॅन व व्यायामाचे व्हिडीओ इतरांसाठी शेअर करतात. सध्या ते इतरांना व्यायाम करण्याचे ऑनलाइन ट्रेनिंग देखील देतात.