
Bjp । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. लवकरच जागावाटपावर अंतिम निर्णय होऊ शकतो. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) खूप मोठा धक्का बसला आहे. याचा पक्षाला आगामी निवडणुकीत परिणाम पाहायला मिळेल. (Latest marathi news)
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप आणि जननायक जनता पक्षाची युती तुटल्याने खट्टर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हरयाणामध्ये (Haryana) आता भाजप स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करणार आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला आहे.
Nilesh Lanke । निलेश लंके शरद पवारांसोबत जाणार का? अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले…
दरम्यान, हरयाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या. असे असूनही भाजपला बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांनी जेजेपीसोबत युती करून सरकार स्थापन केलं. सध्या राजकीय वर्तुळात भाजप नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री बनवणार असल्याची चर्चा सुरु आहे. नायब सिंह हे हरियाणा भाजपचे अध्यक्ष आहेत.
Ajit Pawar । राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य