Site icon e लोकहित | Marathi News

दिल्लीतील बड्या वकिलाने रामदेव बाबांवर केले गंभीर आरोप; म्हणाले, “पतंजलीच्या शाकाहारी ‘दिव्य दंत मंजन’ मध्ये…”

A senior lawyer in Delhi makes serious allegations against Ramdev Baba; Said, "In Patanjali's Vegetarian 'Divya Dental Manjan'..."

पतंजली (Patanjali) भारतातील नावाजलेली आयुर्वेदिक उत्पादने बनवणारी कंपनी आहे. पतंजलीच्या दंतमंजनात माशाच्या हाडांचा वापर केल्याचा दावा वकील शाशा जैन (Sasha Jain) यांनी केला आहे. त्याच दाव्याला अनुसरून दिल्लीतील एका लीगल फॉर्मने (Delhi legal form) योगगुरु रामदेव बाबांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Samsung ची धमाकेदार ऑफर १ लाख रुपयांचा फोन फक्त २२ हजारांना, पाहा भन्नाट ऑफर

पतंजलीचे उत्पादन दिव्य दंतमंजन (Divya dant manjan) हे दात घासण्याचे पावडर असून त्यावर व्हेज असल्याचं हिरवं लेबल देखील आहे. परंतु या दंतमंजनात Cuttlefish हाडांची पावडर आहे असा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. Nonveg पदार्थांचा वापर करून हे दंतमंजन बनवण्यात आले आहे.व त्यावर Veg चं लेबल लावलं आहे.

धक्कादायक! बारामतीमध्ये ३८ लाखांचे प्रतिबंधीत पदार्थ जप्त; पोलिसांनी केली मोठी कारवाई

ग्रीन मार्क (Green mark) दिला आहे असं सांगत ही नोटीस बजावण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कार्यरत असलेल्या शाशा जैन यांनी पतंजलीला नोटीस पाठवलेली आहे. शाशा जैन यांनी त्यांच्या नोटीस बरोबर सगळे पुरावे जोडलेले आहेत.

महाराष्ट्रात दुसरा कोणताही पॅटर्न चालणार नाही, फक्त मोदी पॅटर्न चालणार; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना गंभीर इशारा

त्या दस्तऐवजांमध्ये जैन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, हे दिव्य दंतमंजन शाकाहारी आहे, असं सांगितलं गेलं त्यावर हिरव्या रंगाचे निशाणही लावण्यात आलेलं आहे. परंतु या दिव्य दंतमंजनात Samudra Fen वापरलं आहे. ग्राहकांना याद्वारे फसवलं जात आहे. लेबलिंग नियमांचं (labelling rule) पतंजलीने उल्लंघन केले आहे. असा दावा या नोटीस मध्ये जैन यांनी केला आहे. द प्रिंटने (The print) यासंदर्भात वृत्त दिलेलं आहे.

पुण्यातील ट्राफिक कर्मचारी निलंबित; लाच घेताना कॅमेरात कैद

Spread the love
Exit mobile version