दिव्यांगांसाठी मंत्रालय ही संकल्पना आता महाराष्ट्र राज्यात सत्यात उतरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी नुकताच हा निर्णय घेतला आहे. आमदार बच्चू कडू यांनी अनेक वर्षांपासून यासाठी मागणी केली होती. या मागणीला यश आल्याने बच्चू कडू यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारामध्ये लाडू वाटून आनंद व्यक्त केलाय.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाचे वजन आता मोफत करून मिळणार; ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय
बुधवारी(दि.9) ला घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिव्यांगांसाठी मंत्रालय उभे करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनानिमित्त या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
सावधान! लॉटरीचे आमिष दाखवून होतेय फसवणूक; महिलेचे 50 हजारांचे नुकसान
या मंत्रालयामार्फत मूकबधिरांसाठी खासगी क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ, रोजगार, शिक्षणामध्ये संधी, मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी साईन लॅंग्वेज विकसित करणे यासाठी मंत्रालयामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत.
अक्षय कुमारची मोठी घोषणा; सलग चार चित्रपटांच्या अपयशानंतर घेतला ‘हा’ निर्णय
राज्यातील सर्व दिव्यांगांना या मंत्रालयाचा लाभ व्हावा यासाठी राज्यसरकार कडून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन ( Divyang Bhavan ) देखील उभारण्यात येणार आहे. दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग मंत्रालय व दिव्यांग भवन काम करणार आहेत. अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाचे वजन आता मोफत करून मिळणार; ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय