मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यांनतर उद्धव ठाकरेंचं चांगलेच टेन्शन वाढलं. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट देखील पडले. आता देखील ठाकरे (Thackeray) गटासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
“मला हिंदूंचीच भिती वाटते” – शरद पोंक्षे
शिंदे गटातील उदय सामंत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, “10 ते 15 आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. जरी सरकार पाडण्याच्या काही लोकांनी गोष्टी केल्या असल्या तरी मी असं सांगितलं होतं की 170 हा आमचा बहुमताचा आकडा आहे, असं उदय सामंत (Uday Samant) म्हणाले आहेत त्यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
बिग ब्रेकिंग! मुंबई उच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दणका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संपर्कामध्ये अजून 10 ते 12 लोक आहेत. त्यामुळे 180 ते 182 पर्यंत हा आकडा जाऊ शकतो. नवीन वर्षांत तुम्हाला ते समजेलच, असा दावा देखील उदय सामंतांनी केलाय. यामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.