प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिची महाराष्ट्रभर ख्याती आहे. संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी तिचे कार्यक्रम होतात. विशेष बाब म्हणजे गौतमी कोणत्याच कार्यक्रमाला नाही म्हणत नाही. उद्घाटन, लग्नसमारंभ, वाढदिवस, यात्रा यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटील नृत्यकला सादर करते. परंतु, गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी ! हे समीकरण तयार झाले आहे. यामुळे बऱ्याचदा तिच्या कार्यक्रमात चुकीच्या घटना घडतात. (Accident in Gautami Patil’s event)
एकदम हटके अदांमुळे एका रात्रीत फेमस झालेली मुलगी आठवतेय का? आता समुद्रकिनारी करतेय…
वैजापूर ( Vaijapur) तालुक्यातील महालगाव याठिकाणी नुकताच गौतमी पाटीलचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. यामध्ये गौतमी पाटीलचे नृत्य सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. कार्यक्रमात भरपूर गर्दी झाल्याने काही तरुण एका दुकानाच्या पत्र्यावर चढून बसले होते. कार्यक्रम ऐन रंगात आल्यानंतर अचानक दुकानावरचा पत्रा कोसळला आणि पत्र्यावर असणारे तरुण खाली पडले.
Accident । भीषण अपघात, बसचा चेंदामेंदा; आयुष्यातील ठरला शेवटचा बस प्रवास; चार जणांचा जागीच मृत्यू
कार्यक्रमात कसलीच जागा नसल्याने जवळपास १० ते १५ तरुण पत्र्याचे शेड असणाऱ्या दुकानावर चढून बसले होते. मात्र त्या कमकुवत पत्र्याला एवढ्या लोकांचे वजन सहन झाले नाही. काही वेळातच क्षमतेपेक्षा जास्त वजनाने पत्र्याचे छत कोसळले. यामुळे पत्र्यावर असणारे तरुण खाली पडले. यामध्ये मोठी जीवितहानी झाली नसली तरी तरुणांना छोटी-मोठी दुखापत झाली आहे.