रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार, दोन नर्सेसने तरुणांना केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

A shocking incident happened in the hospital, two nurses brutally beat up the youth; The video went viral

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. अशातच रुग्णालयातील दोन नर्सेसचा (Nurses) एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल झाला आहे. खरतर आपण आजारी पडलो की आपल्याला उपचारासाठी रुग्णालयात जावं लागतं. दरम्यान रुग्णालयात गेलं की आपली देखरेख नर्स करत असतात. दरम्यान सध्या रुग्णालयातील दोन नर्सचा व्हिडिओ व्हायरल झाला असुन, या व्हिडिओत त्या दोघी तरुणांना मारताना दिसतं आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले आहेत.

कांदा दरवाढीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह, सर्वसामान्यांना मिळतोय दिलासा पण शेतकरी बंधूंना बसू शकतो फटका

नेमक प्रकरण काय आहे ?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुणांना या नर्सेसने ओलीस ठेवले आहे. तसेच एका नर्सेसच्या हातात लाकडाची काठी आहे. व्हिडीओमध्ये या दोन नर्सेस तरुणांना मारताना दिसतं आहेत. इतकंच नाही तर संतप्त परिचारिका तरुणांना मोबाईल डिव्हाइसमधील रेकॉर्डिंग हटवण्याची धमकी देत आहेत. ही संतप्तजनक घटना बिहारच्या (Bihar) छपरा रुग्णालयातील (Chapra hospital) आहे.

मोठी बातमी! फटाका स्टॉलला आग लागून दोघांचा मृत्यू

खरतर हे हे दोन तरुण वैद्यकीय प्रमाणपत्रे घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. जेव्हा हे दोघं तरुण रुग्णालयात प्रमाणपत्रे घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना रुग्णालयाची परिस्थिती खराब (recording poor condition of Hospital) दिसली. तेव्हा त्यांनी रुग्णालयाची ही खराब परिस्थिती कॅमेऱ्यात कैद केली. दरम्यान त्या दोघांनी परिस्थिती कॅमेऱ्यात कैद केल्याचे नर्सेसला समजले. दरम्यान त्या दोन नर्सेसने या दोन तरुणांना ओलीस ठेवलं आणि त्यांना मारहाण केली.

Arjun Kapoor: मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने शेअर केला रोमँटिक फोटो; पाहा PHOTO

‘अशी कुठलीही घटना घडली नाही…’

हा मारहाणीचा व्हिडिओ एनसीएम इंडिया कौन्सिल फॉर मेन अफेयर्सच्या (NCMIndia Council For Men Affairs) ट्विटर पेजवर शेअर केला आहे. दरम्यान NCM इंडिया कौन्सिल फॉर मेन अफेयर्सने सांगितले की, “सदर हॉस्पिटल, छपरा, बिहारच्या दोन परिचारिकांनी दोन तरुणांना 4 तासांसाठी ओलीस ठेवले होते. तसच हॉस्पिटलच्या अयोग्य सुविधा व्हिडिओमध्ये कॅप्चर केल्याने त्यांच्यावर लाठीमार केला. दरम्यान या परिचारिकांवर अजूनही एफआयआर दाखल झालेला नाही. इतकंच नाही तर जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनने अशी कोणतीही घटना घडल्याचा नकार दिला आहे.

साखर उद्योगाला बुस्ट मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शेतकऱ्यांना दिला विशेष कृती आराखडा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *