सुट्टीचा दिवस गाठून फिरायला जाणे हा अनेकांचा छंद असतो. बरेच लोक फिरण्यासाठी समुद्र किनाऱ्याला प्राधान्य देतात. मात्र बऱ्याचदा हे सुट्ट्यांचे (Holiday Plans) प्लॅन्स चांगलेच अंगलट येतात. अशीच एक घटना कळंब समुद्राच्या किनाऱ्यावर घडली आहे. रविवारी (ता.13) सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नालासोपारा वरून 4 जणांचा गृप कळंब समुद्र (Kalamb Sea) किनाऱ्यावर गेला होता.
आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर जोरदार टीका; म्हणाले, “समोर आलेल्या भ्रष्टाचारावर…”
दरम्यान समुद्र किनाऱ्यावर पोहत असताना यातील दोन जण पाण्यात बुडाले. यातील एकाचा मृतदेह रात्री सापडला व दुसऱ्याचा आज सकाळी सापडला आहे. मृतदेह सापडलेल्या तरुणांची नावे रोशन गावडे व सौरभ पाल अशी आहेत. हे दोन्ही तरुण नालासोपारा पूर्व बिलालापाडा श्रीरामनगर येथे राहणारे आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथमध्ये दोन चिमुकल्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
कळंब समुद्र किनाऱ्यावर सुट्टीची मज्जा घेत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. सुदैवाने उरलेले दोघेजण सुखरूप पाण्याच्या बाहेर पडले. यावेळी जीवरक्षक जनार्दन मेहेर व चारुदत्त मेहेर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बुडालेल्या दोघा जणांना शोधण्याचा प्रयत्न केला.
“हिंदूंच्या घरामध्ये जर दोन मुल असतील तर त्यातील एकाला…” बागेश्वर बाबांचे मोठे वक्तव्य
घटनेदरम्यान सुखरूप असणाऱ्या दोघांजणांनी आरडा ओरडा करून लोकांना गोळा केले. यावेळी उपस्थित लोकांनी बुडणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र लाटेचा वेग जास्त असल्याने ते समुद्राच्या लाटेसोबत वाहून गेले. मज्जा मस्ती करायला आलेल्या मित्रांचा असा धक्कादायक मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाटू नाटू गाण्याला ऑस्कर अवॉर्ड मिळताच अमोल कोल्हेंचे ‘ते’ ट्वीट चर्चेत