अतिशय अडगळ असणाऱ्या ठिकाणी किंवा गलिच्छ ठिकाणी उंदीर, साप किंवा विंचू यांसारखे प्राणी आढळतात. मात्र चक्क विमानात असले प्राणी आढळणे म्हणजे आश्चर्यच ! (Scorpion in airoplane) नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानात विंचू घुसल्याची घटना घडली आहे. येथे एका प्रवासी महिलेला या विंचूने दंश केला. विंचूने डंख मारल्याने विमानातच महिलेची प्रकृती ढासळू लागली होती. दरम्यान विमान मुंबईमध्ये पोहोचताच कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ मराठी कलाकारांसोबत घडला धक्कादायक प्रकार; ऐकून अंगावर काटा येईल…
याठिकाणी प्राथमिक उपचार केल्याने महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली व तिला घरी सोडण्यात आले. मीडिया रिपोर्ट नुसार, मुंबई मध्ये राहणारी ही महिला काही कामानिमित्त नागपुरात आली होती. २३ एप्रिलला ती विमानाने माघारी परतत असताना ही घटना घडली. महिला विमानात बसल्यानंतर थोडा वेळ जाताच अचानक ओरडू लागली.
शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यांनंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले….
यावेळी फ्लाईट अटेंडंट त्वरित जाऊन चौकशी केली असता, महिलेला विंचूने दंश केल्याचे समोर आले. ही गोष्ट समजताच विमानातील इतर प्रवासी सुद्धा प्रचंड घाबरले होते. दरम्यान घाईघाईने संपूर्ण विमान तपासण्यात आले. मात्र विंचू कुठेही सापडला नाही. परंतु, ज्या महिलेला विंचू चावला होता तिची स्थिती फार गंभीर झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
मोठी बातमी! यूट्यूबला कंटेंट व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू