प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा ‘बलोच’ हा बहुचर्चित चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. पानिपतचा पराभव व त्यानंतर गुलामगिरीत होरपळलेले बलुचिस्तानातील मराठे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बलोच चित्रपटाच्या टीमने ( Baloch Movie team) बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत. हा चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याबद्दल सांगताना चित्रपटाच्या टीमने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला मागे
बलोच चित्रपटाचे शूटिंग ( Shooting) सुरू असताना तिथल्या गावकऱ्यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला एका खोलीत डांबून ठेवले होते. याचा खुलासा यावेळी करण्यात आला आहे. जैसलमेर पासून 60 ते 70 किलोमीटर पुढे पाकिस्तान बॉर्डरवर ( Pakistan Border) असणाऱ्या खुर्जी गावात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. ४-५ दिवस हे शूटिंग सुरू होते. यावेळी शूटिंग सुरू असताना चित्रपटाची टीम आणि तेथील स्थानिक प्रोडक्शन यांच्यात काही कारणांमुळे वाद झाले. त्या लोकांना इतका राग आला की त्यांनी चित्रपटाच्या टीमला तिथे डांबून ठेवले.
मोठी बातमी! यूट्यूबला कंटेंट व्हिडीओ बनवण्याच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
नंतर पोलिसांच्या मदतीने हे प्रकरण मिटवले गेले. यासाठी त्या स्थानिक लोकांना साठ लाख रुपये द्यावे लागले. दरम्यान वाद झाले होते त्या काळात तिथल्या लोकांनी चित्रपटाच्या टीमला साधे जेवणही दिले न्हवते. बलोच चित्रपटाचा सहनिर्माता व अभिनेता अमोल कांगणे ( Amol Kangane) याने हा अनुभव सांगितला आहे.
शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यांनंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले….