
मॉडेलिंग क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा युवा युतींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसेच या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तरुण युवा युवती वेगवेगळ्या टिप्स फॉलो करतात व वेगवेगळे प्रयत्न देखील करतात. मात्र मॉडेलिंग (modelling) क्षेत्रामध्ये काम करून मिळवा पाच ते सात हजार रुपये असे सांगून पुण्यामध्ये तरुण युवा युवतींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या प्रकाराचा कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 23 मुलांकडून 43 लाख 93 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे.
Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच, पहिल्यांदाच घडलं असं; गौतमीच मार्केट डाऊन?
श्रद्धा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर), जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे, अनिरुद्ध बिपीन रासने (रा. कोथरुड) या सर्व आरोपींवर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका रंगभूषाकार युतीने ही तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. या तरुणीने सांगितले की मॉडेलिंग क्षेत्रात कामाची संधी असल्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. ही कामाची संधी रंगभूषाकार, केशरचना, छायाचित्रकारांना मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जाणाऱ्यांना युवा युवतींना आहे. व दररोज पाच ते सात हजार रुपये देखील मिळतील असे सांगण्यात आले. तक्रारदार श्रद्धा अंबुरे ही त्या कंपनीला भेटायला देखील गेल्या होत्या त्यानंतर त्यांना पैसे भरावे लागतील असे सांगण्यात आले.
सोलापूरच्या शेतकऱ्याने चक्क आंब्याला दिलं शरद पवार यांचं नाव; कारणही केलं स्पष्ट…
तीन महिन्यांसाठी चार हजार ४२५ रुपये आणि दोन वर्षांसाठी १७ हजार रुपये भरावे (Subscription) लागतील. असे सांगून युवा युवतींचा समूह तयार करण्यात आला. सर्व युवा युवतींना द पुणे स्टुडिओला (The Pune Studio) बोलवण्यात आले. यावेळी 21 मार्चपासून हे काम सुरू होईल असे युवा युतींना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांची कंपनी ही आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांना काम मिळाले नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर त्या युवा युतीच्या लक्षात आले की आपली फसवणूक होत आहे. आतापर्यंत 43 युवा युतीची फसवणूक करण्यात आली आहे व त्यांच्याकडून 43 लाख 93 हजार रुपये घेण्यात आले आहे. या सर्व घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.
Arpita Khan | मोठी बातमी! सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी