Suriya | दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार सूर्याने रविवारी आपला 48 वा वाढदिवस साजरा केला आहे. सेलिब्रिटींचे वाढदिवस असो किंवा राजकीय व्यक्तींचे वाढदिवस असो चाहते त्या दिवशी एकदम जल्लोषात असतात. यासाठी अनेक तयारी देखील केली जाते. सेलिब्रिटींचे बॅनर लावणे तसेच सोशल मीडियावर काही व्हिडिओ बनवणे अशी कृती चाहते करत असतात. मात्र सूर्याच्या वाढदिवसाचे बॅनर लावणे दोन चाहत्यांच्या जीवावर घेतले आहे.
Ajit Pawar । आमदारांच्या निधी वाटपात ‘दादा’गिरी? अजित पवारांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…
आंध्रप्रदेश मधील पलनाडू जिल्ह्यामध्ये सूर्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावणाऱ्या दोन चाहत्यांचा करंट लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. नक्का व्यंकटेश आणि पोलुरी अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघे कॉलेजचे विद्यार्थी सूर्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा बॅनर लावत होते मात्र फ्लेक्सच्या लोखंडी रॉडचा ओव्हरहेड विद्युत तारेला स्पर्श झाल्याने या दोघांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Adani Group । ब्रेकिंग न्यूज! गौतम अदानींनी विकली 1,600 कोटींची कंपनी
या घटनेनंतर त्या दोघांचं पार्थिव नरसरावपेठ येथील शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर अद्याप अभिनेता सूर्याची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.
JioBook laptop । आनंदाची बातमी! जिओ लाँच करणार स्वस्त लॅपटॉप, मिळतील जबरदस्त फीचर्स