Crime News । मंदिरात प्रवेश केला, देवाला नमस्कार करून पूजा केली आणि… भरदिवसा घडला धक्कादायक प्रकार

Crime News

Crime News । हल्ली चोरीच्या (Theft) घटनेमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या घटनांमुळे काही ठिकाणी निष्पाप नागरिकांचे जीवही जातात. कायदे कडक करूनदेखील या घटना कमी झाल्या नाहीत. (Crime) अलीकडे भरदिवसा देखील चोरीच्या घटना घडत आहेत. अशातच आताही देखील एक चोरीची घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का!

कल्याणमध्ये चोरांनी देवालाही सोडले नाही. चोरटयांनी चक्क देवळात जाऊन देवाची पूजा करून चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण पूर्व येथील पत्रीपुलापलिकडे रेल्वे समांतर रस्त्यावर असणाऱ्या कचोरे येथील गावदेवी मंदिरात एकदा चोरीचा प्रकार घडला असून हा संपूर्ण प्रकार मंदिरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

Bus Accident । होळीच्या दिवशीच घडलं भयानक, प्रवाशांनी भरलेली बस कोसळली दरीत; अनेक प्रवाशी…

मिळालेल्या माहितीनुसार, एक चोरटा दर्शन घेण्याच्या बहाण्याने मंदिरात आला. त्यापाठोपाठ त्याचा दुसरा साथीदारही मंदिरात आला. या दोघांनी पूजा केली आणि देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या. चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे 30 हजार रुपये आहे. सायंकाळी ग्रामस्थ मंदिरात गेले असता त्यांना चोरीचा प्रकार समजला. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Vijay Shivatare । ब्रेकिंग! विजय शिवतारे यांनी जाहीर केला सर्वात मोठा निर्णय

Spread the love