माळशिरस: सध्याच्या परिस्थितीत शेती क्षेत्र (agricultural sector) मोठ्या प्रमाणात विकसित झालं आहे. शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाले असून आता अल्पभूधारक (Smallholder) शेतकरी (Farmers) शेतीत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. माळशिरस (Malshiras) तालुक्यातील कन्हेर गावातील अशाच एका अल्पभूधारक शेतकऱ्याने पावने दोन एकरामध्ये तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. माळशिरस हा दुष्काळी पट्ट्यातील तालुका आहे. महत्वाचं म्हणजे शेती तोट्यात असे म्हणाऱ्यांना अद्दल घडवूण आणणारा हा प्रयोग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
खडकीच्या सरपंचपदी सौ.सविता शितोळे यांची बिनविरोध निवड!
बाळासाहेब आणि रामदास सरगर या बंधूनी केवळ पावने दोन एकरामध्ये पपईची लागवड (Papaya) केली होती. फ्कत आठ महिने अथक परीश्रम करून आणि योग्य नियोजन करुन सरगर बंधू यांनी तब्बल 22 लाखाचे उत्पन्न मिळवले आहे. आज संपूर्ण पपईची बाग 2100 रोपांमधून फुलली गेली. सरगर यांच्या पपई बागेतील एका झाडाला अंदाजे 80 ते 90 फळ लागले आहे. कन्हेर गावच्या माळरानावरील पपईला आता परराज्यातून मागणी होत आहे.
चेन्नई आणि कोलकत्ता येथून सरगर यांच्या पपईला मागणी आहे. उत्पादनात घट आणि मागणी अधिक यामुळे पपईला अधिकचा दर मिळाला आहे. संपूर्णपणे पारंपारिक आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करून सरगर बंधूनी 22 लाखाचे उत्पन्न मिळवले. ही पद्धत सध्या इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. दरम्यान हा प्रयोग सेंद्रिय शेतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मिळाली परवानगी, शिंदे गटाला हायकोर्टाचा दणका