सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त पोस्ट ( Controversial Post) केल्या जातात. या ऑनलाइन पोस्टवर लोक सामान्यपणे ऑनलाइन रिऍक्ट होतात किंवा वाद घालतात. मात्र कधी कधी याचे पडसाद ऑफलाईन देखील उमटतात. अकोला येथे एक असाच प्रकार घडला आहे. एका वादग्रस्त पोस्टमुळे अकोल्यातील जुन्या शहर भागात दोन गटात मोठा राडा झाला. याठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे.
हरिहरपेठ भागात राजराजेश्वर सेतू येथे एक मोठा गट आला. या गटाने रागात दगडफेक आणि जाळपोळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दंगलखोर लोकांनी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. याशिवाय काही ठिकाणी गाड्यांना आग लावण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. ( Violence due to controversial post)
‘बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे’ लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने शेतकरी मुलाचे अनोखे आंदोलन!
यामध्ये दहा पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दरम्यान ही घटना घडताच जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात १४४ कलम लागू केले. या घटनेने परिसरात अतिशय भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
भाजपच्या पराभवावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुन्हा एकदा विकास आणि…”