केंद्र सरकार (central government) आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असतात. दरम्यान अशातच राज्य सरकारने (state government) “शरद पवार ग्रामसमृद्धी” योजना (Sharad Pawar Gram Samruddhi” scheme) आणली आहे. महत्वाची बाब म्हणजे या योजनेत शेळी (the goat), कुक्कुट पक्षी, गाय- म्हैस पालनासाठी (For cow-buffalo rearing), शेड बांधकामासाठी अनुदान दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यात या योजनेला 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान या लेखात आपण शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शेळी पालनाचा विचार करताय?, आता १० शेळ्या पाळण्यासाठी मिळणार ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
विशेष म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत आणि काही योजनांच्या एकत्रीकरणातून ही शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक लाभाच्या 4 कामांसाठी अनुदान दिलं जाणार आहे. मग यामध्ये गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधण्यासाठी, तसेच शेळीपालनासाठी शेड बांधण्यासाठी , कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे आणि भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग यांसाठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करा.
‘या’ योजनेंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 27 लाख रुपये; वाचा सविस्तर
‘या’ कामासाठी मिळणार इतके अनुदान?
गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकामसाठी ज्या गोठ्यात 2 ते 6 गुरे बांधता येतील अशा गोठ्यसाठी 77,188 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे. तसेच ज्या गोठ्यात 6 पेक्षा अधिक गुरांसाठी 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.
मोठी दुर्घटना! मुंबईतील गिरगावमधील गोदामात आग लागून १४ गाड्या जळून खाक
शेळीपालन शेड बांधकामामध्ये ज्या शेडमध्ये 10 शेळ्या बांधता येतील अशा शेडसाठी 49,284 रुपये अनुदान मिळणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे. पण महत्वाची बाब म्हणजे अर्जदाराकडे जर 10 शेळ्या नसतील तर किमान त्याच्याकडे 2 शेळ्या असाव्यात. ही सर्व माहिती शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे.
खुशखबर! आता आधार कार्डद्वारे देशभरात कुठेही घेता येणार रेशन कार्डवरील धान्य, वाचा सविस्तर माहिती