जरी देशाची प्रगती झाली असली, लोकांचे जूने विचार बदलले असले तरी आजही अंधश्रद्धेला (Superstition) कुठेना कुठे लोक बळी पडताना दिसत आहेत. आपल्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली मांत्रिकांच्या (witches) भूलथापांना महिला बळी पडताना (women become victims) अनेक धक्कादायक प्रकार घडतं असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान अशातच भोपाळमधील (bhopal) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण भोपाळमधील खंडवा जिल्ह्यातील आहे.
स्वाभिमानीचा एकरकमी एफआरपी व जादा 350 रुपयांसाठी आक्रमक भूमिका, तीन कारखान्यांची रोखली ऊस वाहतूक
एक शिक्षिका (वय 30) त्वचेच्या समस्येने सन 2019 पासून त्रस्त होती. तिच्यावर डॉक्टरांच्या औषधांचा काहीही परिणाम होत नव्हता. याच कारणामुळे शिक्षिका कथित तांत्रिकाच्या भूलथापांना बळी पडली. पीडित महिलेला तिच्या मित्राने सांगितल की, “शशिकांत एक मोठा बाबा आहे. तो तांत्रिक कृतीने तुझा त्रास दूर करेल. ” आपल्या मित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित महिला तात्काळ शशिकांत बाबाला भेटायला घरी गेली. यावेळी या शशिकांत मांत्रिकाने सांगितल की,” तुझ्या घरात भूत आहे.”
मोठी बातमी! नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका, ‘या’ दहशतवादी संघटनेच्या टार्गेटवर
हे ऐकून पीडित महिला घाबरली. त्यानंतर त्या मांत्रिकाने काही मंत्र वाचले, मात्र प्रश्न सुटला नाही. पुढे तो म्हणाला की , “तुझ्या अंगात जिन आहे, त्याला हाकलण्यासाठी शारीरिक संबंध करावे लागतील.” हे करा सांगून तांत्रिकाने अनेकवेळा त्या शिक्षिकेवर लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप पीडित शिक्षिकेने केला आहे.
टोमॅटोचे भाव भिडले गगनाला, प्रति कॅरेट मिळाला ‘इतका’ रुपये दर
दरम्यान अखेर या शिक्षिकेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. हे ऐकून पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. दरम्यान त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणाबाबत सीएसपी पूनम चंद यादव यांनी सांगितले की, आरोपी तांत्रिक हा चिरा खान येथील रहिवासी असून तो व्यवसायाने प्लंबर आहे.
श्रीगोंद्यामध्ये ११२५ जनावरांना लंम्पीची लागण तर 62 जनावरे दगावली