दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये तुफान पाऊस होत असल्याचे दिसत आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली आहे. दरम्यान पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खालापुरात काल रात्री गावावर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हृदयद्रावक! चार महिन्याचे बाळ हातून निसटलं आणि गेलं पाण्यात वाहून
सूत्रांच्या माहितीनुसार, या दरडीखाली 60 ते 70 जण दबले असल्याची माहिती समोर आली आहे. तर या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आह. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. सध्या तेथील लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काल रात्री 10.30 च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.
खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागामध्ये मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. या वाडीवर रात्री दरड कोसळली. या घटनेची माहिती मिळताच तेथील आजूबाजूच्या गावातील लोकांनी देखील घटनास्थळी धाव घेत मदत करायला सुरवात केली.