
Ahmednagar Ashti Train । अनेकजण रेल्वेने प्रवास (Train) करतात. कारण रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी आणि सुखकर असतो. रेल्वेला तिकिटासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाही. परंतु एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये रेल्वेचे एकूण पाच डबे जळून खाक(Train Fire) झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Latest Marathi News)
Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
मराठवाड्यासाठी खूप महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असणाऱ्या अहमदनगर आष्टी रेल्वेला वाळूंज येथे दोन डब्यांना आग (Ahmednagar Ashti Train Fire) लागली. या घटनेमागील कारण समोर आलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार सुरुवातीला ही आग पहिल्या दोन डब्यांना लागली होती, परंतु ती पुढे पाच डब्यांपर्यंत गेली. स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
Agriculture News । फुलांनी सजल्या बाजारपेठा, किलोला मिळतोय विक्रमी दर
परंतु या घटनेत आगीत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचं प्रमाण वाढल्यानंतर एकूण गार्ड ब्रेक कोच आणि चार डब्यांना आग लागली. आग दुपारी ३ वाजून २४ मिनिटांनी लागली. परंतु आगीचे कारण अजूनही समोर आले नाही. रेल्वे प्रशासनाकडून याचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, अग्निशामक दल आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.