आजवर तुम्ही लग्नातून नवरी किंवा नवरदेव पळून गेलेल्या घटना ऐकल्या असतील. पण मध्य प्रदेशात एक अजबच घटना घडली आहे. चक्क वऱ्हाडच नवरीला घेऊन पळून गेलं आहे. या लग्न समारंभात एक अजबच किस्सा घडला ज्यामुळे संपूर्ण लग्नात गोंधळ निर्माण झाला. गर्दीमुळे लोकांची चेंगराचेंगरी झाली. काही क्षण पालटताच आनंदाचे क्षण दुःखामध्ये परिवर्तित झाले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावत होते. नेमकं घडलं तरी काय या लग्नात? चला जाणून घेऊया.
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यात एका लग्न समारंभात वादळी वाऱ्याने कहर केला. लग्नाला उपस्थित असलेले लोक त्यापासून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या लग्नाची तयारी, मंडप वगैरे शेतामध्ये घालण्यात आला होता. परंतु दुर्दैवाने खूप मोठं वादळ आलं आणि या वाऱ्यामुळे शेतात लावलेला तंबू शेकडो फूट उंच आकाशात उडाला. या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या वादळी वाऱ्याचे लोक देखील शिकार झाले आहेत. संपूर्ण लग्न समारंभाचा बट्ट्याबोळ झाला.
मोठी बातमी! दहावीचा निकाल जाहीर, एका क्लीकवर पहा तुमचे मार्क
खरं तर, हे लग्न खारगोन जिल्हा मुख्यालयापासून 70 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गिरण्या विकासगटातील पुतला गावात राहणाऱ्या भुरा यांची मुलगी गीताच लग्न होतं. तिचं लग्न मांडवी इथल्या सुभान सिंह यांच्या सुपुत्राशी होते. लग्नाची तारीख निघाली एका शेतामध्ये लग्नाचा मंडप टाकण्यात आला. वऱ्हाड मंडळीसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. लग्नविधी केले जात होते मात्र, अचानकच वादळ आलं आणि सर्व आनंदावर जणू वादळच फिरलं. या वादळामुळे मंडप तर मोडून पडला पण जेवण देखील खराब झालं. वऱ्हाडी मंडळींना मात्र उपाशीपोटीच परतावं लागलं.
“काहीच न मिळाल्यास ऊस तोडायला जाऊ”, पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य