Nashik News । नाशिक : आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. जर आरोग्याकडे लक्ष नाही तर अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो. अनेकांना हृदय विकाराचा (Heart disease) त्रास होतो. यात अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. विशेष म्हणजे लहान मुलांना देखील हृदय विकाराच्या धक्क्याने जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)
नाशिकच्या लहवित गावातील तेजस विठ्ठल आहेर (वय 16 वर्ष) या मुलाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. साधारतः एप्रिल आणि मे महिन्याचा काळ म्हणजे उष्माघाताची शक्यता जास्त असते.
Rahul Gandhi । महिला नेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या; “माझं राहुल गांधींसोबत लग्न….”
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. तणाव, हवामानातील बदल, खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलत्या जीवनशैलीमुळे हा धोका वाढत आहे, असा अंदाज आहे.पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.