भारतीय लोकांना परदेशाचे आकर्षण आहे. एकदा लोक परदेशी गेले की बऱ्याचदा तिकडचेच होऊन जातात. आपल्या मुलांना देखील तिथले नागरिकत्व मिळावे यासाठी प्रयत्न करतात. मात्र पुण्यातील (Pune) भोसले दांम्पत्य परदेशात राहून सुद्धा आपले संस्कार विसरले नाही. परदेशात राहून देखील त्यांनी आपल्या मुलीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवले आहेत. या दाम्पत्याने आपल्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलीला पोवाडे व शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) शौर्य कथा शिकवल्या आहेत.
अदानी झाले आनंदी! वित्तीय आयोगाने दिली क्लीन चिट
वेदांशी भोसले असे या तीन वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील असणारी वेदांशी ही सध्या तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क ( Denmark) येथील ओडेन्स या शहरात राहते. तिची आई प्रीती भोसले ही गृहिणी आहे आणि वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वेदश्री परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खड्या आवाजात गाते. एवढंच नाही तर तिने शिवरायांच्या शौर्य कथा आणि पोवाड्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book Of records) विक्रम नोंदवला आहे.
बॉयफ्रेंड रुसला म्हणुन तिने लिहिले पत्र; म्हणाली, “लव्ह यू माझा कबुतर, जानू, फौजी, टमाटर रसगुल्ला…”
ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात वेदश्रीने 3 मिनिटे आणि 58 सेकंदात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा गायला आहे. यावेळी सर्वात लहान वयात पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे. वेदांशी अगदी 2 वर्षांची असल्यापासून तिला मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरत्या शिकवले गेले आहे. तिच्यावर भारतीय संस्कार व्हावे यासाठी तिचे आईवडील प्रयत्न करतात.
कसबा चिंचवड निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची; आमदार गिरीश बापट आजारी असूनही प्रचारासाठी मैदानात