
Agricultural News । पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात शेतीमध्ये (Agriculture) खूप मोठे बदल झाले आहेत. पूर्वी कोणतेही यंत्र नसल्याने शेतीमध्ये खूप कष्ट करायला लागत होते. परंतु जसजसे बाजारात यंत्रे (Agricultural Machines) येऊ लागली तसतशी शेतीची कामे सोयीस्कर होऊ लागली आहे. यंत्रांमुळे शेतीची कामे जलद होऊ लागली आहे. यंत्रांमुळे शेतीमध्ये खूप पैसे खर्च करावे लागत आहेत. (Latest Marathi News)
हीच समस्या लक्षात घेता आता राहाता तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी पुंडलिक बळवंत भवार यांनी एक अनोखे यंत्र बनवले आहे. त्यांनी आंतर मशागतीची कामे करण्यासाठी जुन्या मोटारसायकलला चक्क मिनी ट्रॅक्टरचा (Mini tractor) भाग जोडून तीनचाकी यंत्र बनवले आहे. विशेष म्हणजे कमी खर्चात या यंत्राच्या मदतीने कामे पार पडत आहेत. यू ट्यूबच्या माध्यमातून त्यांनी हे यंत्र बनवले आहे.
मजुरीचा वाचेल खर्च
या यंत्रांमुळे आता मजुरीचा खर्च वाचणार आहे. कारण या यंत्रामुळे खुरपणी, कोळपणी आणि इतर आंतरमशागतीची कामे केली जाणार आहे. जर मजुरीच्या खर्चाचा विचार करायचा झाला तर मजुरीला ३०० ते ४०० रुपयांपर्यंत खर्च येतो. परंतु हे काम जलद गतीने होत नाही. परंतु आता या भन्नाट यंत्रांमुळे पिकांमधील तण तर निघतेच परंतु त्यासोबत पिके सुदृद होतात.
हनीमूनसाठी गेलेली नववधू हॉटेलमधून अचानकच झाली गायब… धक्कादायक माहिती आली समोर
यंत्र बनवण्यासाठी किती आला खर्च?
एक एकराला एक हजार रुपये इतका खर्च येतो. यंत्राच्या खर्चाचा विचार केला तर हे यंत्र बनवण्यासाठी भवार यांना एकूण ४० ते ५० हजार रुपये खर्चावे लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे यंत्र वजनाने खूप हलके आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही. मागील तीन वर्षांपासून त्यांनी या यंत्राच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो एकर क्षेत्राची कोळपणी आणि आंतर मशागतीची कामे केली आहेत.
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! साखरेचे दर वाढणार की कमी होणार? निर्यातीवर बंधने येण्याची शक्यता
जाणून घ्या वैशिष्ट्य
त्यांनी राजदूत कंपनीच्या १२५ सी.सी. इंजीन क्षमता असणाऱ्या मोटारसायकलचा मिनी ट्रॅक्टर बनवला आहे. तिला पाच फनी कोळपे बसवले असल्याने सहज शेतीमधील पिकांची आंतर मशागतीची कामे केली जात आहे. वजनानेही ये यंत्र हलके आणि कमी खर्चिक असल्याने ते सर्वांच्या पसंतीस उतरले आहे.
सरकारची मोठी घोषणा! वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 25 लाखांची मदत