औरंगाबाद: शालेय विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रातील ग्रहताऱ्यांचा लळा लावणारी अनोखी कार्यशाळा गुरुवारी शहरातील सरस्वती भुवन शाळेत संपन्न झाली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील खगोलशास्त्र क्लब ने ही कार्यशाळा आयोजित केली होती.
विक्रमी पीक काढल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?
खगोलशास्त्राच्या मूलभूत संकल्पना आणि त्यावर आधारित भविष्यातील करिअर या विषयावर ही कार्यशाळा घेण्यात आली. इयत्ता नववी आणि दहावीच्या 70 हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवला. खगोलशास्त्र क्लबच्या सदस्यांनी प्रश्न उत्तर स्वरूपाने खगोलशास्त्रातील मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या. यातूनच शालेय विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्रातील ग्रहताऱ्यांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता पाहायला मिळाली. अश्या पद्धतीची माहितीपर कार्यशाळा पुन्हा आयोजित करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
”सुषमा अंधारे माकडीण…”, शिंदे गटाच्या महिलेची बोचरी टीका
या कार्यशाळेला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खगोल मंडळाचे सदस्य असलेले पुष्कर भालेराव, मनिष ढाणवे, सौरभ बनकर तिर्थराज शिंदे, अनिकेत लोमटे सौरभ घटोल यांची उपस्थिती होती.
(प्रतिनिधी – ज्ञानेश्वर ताले)
देशातील तरुण पिढी नशेखोर होण्याला केंद्र सरकार जबाबदार; नाना पटोले यांच्याकडून गौप्यस्फोट!