
सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुद्वारामध्ये एक महिला मद्यपान करून गोंधळ करत होती. यावेळी एका भक्ताने त्या महिलेची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी सोमवारी माहिती दिली आहे. (A lady was making a fuss in the gurdwara after drinking. At this time, a devotee shot and killed the woman)
मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी! राज्यात ‘या’ दिवशी होणार दाखल, हवामान तज्ञांचा अंदाज
पटियाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमिंदर कौर ही महिला दुखनिवार साहिब गुरुद्वाराच्या ‘सरोवरा’जवळ दारू पित होती. यावेळी निर्मलजीत सिंग या गुरुद्वाराला नियमित भेट देणाऱ्या भक्ताने ३२ वर्षीय महिलेवर गोळ्या झाडल्या होत्या. यांनतर कौर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यावेळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Gautami Patil । बार्शीत गुन्हा दाखल होताच गौतमी पाटीलने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “मी फक्त…”
त्याचबरोबर या घटनेमध्ये अजून एक व्यक्ती जखमी झाली आहे. त्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे.
प्रसिद्ध क्रिकेटपटूचं शार्दुलबद्दल संतापजनक वक्तव्य, WTC Final आधी नको ते बोलला अन्…