“एका महिलेने चिंचवडमध्ये पाडलं”, निलेश राणे यांची अजित पवारांवर जोरदार टीका

"A woman felled in Chinchwad", Nilesh Rane's strong criticism of Ajit Pawar

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुका (Kasba and Chinchwad by-elections) गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आहेत. या निवडणुकांचा निकाल गुरुवारी ( २ मार्च ) लागला आहे. या निवडणुकीत कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडून आले. तर, चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या निवडून आल्या आहे. या निकालानंतर राज्याचे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापल्याचे दिसत आहे. यामध्येच आता भाजप नेते निलेश राणे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जहरी टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांकडून चौकशी सुरू; घटनेचे CCTV फुटेज देखील आले समोर

याबाबत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “पिंपरी चिंचवड मध्ये एका महिलेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडला, **** अजित पवार एक महिना पिंपरी चिंचवडला ठाण मांडून सुद्धा तुला एका महिलेने पाडला महिलेने.” अशा शब्दामध्ये निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“माझा टीशर्ट ४५ हजार रुपयांचा….” कपडे, दागिने, बूट याबद्दल एमसी स्टॅनने केला मोठा खुलासा

आता निलेश राणेंच्या या ट्विटला अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी म्हणाले, “फारच चिल्लर झालास तु तर, आमच्या पक्षाच्या काही मर्यादा आहेत नाहीतर , तुझ्यापेक्षा खालची पातळी मला गाठता येते. तुझी लायकी जनतेला माहीत आहे. घाणीत दगड मारायची सवय नाही आम्हाला”. असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

मोठी बातमी! संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार नाराज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *