मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वे वर केमिकल टँकरला आग लागली आणि हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. (There was a major accident on the Mumbai-Pune Express)
मोठी बातमी! २६ जूनला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या येणार बारामतीला
सूत्रांच्या माहितीनुसार, केमिकल टँकर पुलावर असताना लागलेल्या या आगीमुळे पुलाखालून जाणाऱ्या गाड्यांची देखील हानी झाली आहे.टँकरच्या चालकाचा ताबा सुटला हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. टँकरवरील ताबा सुटल्याने केमिकल रस्त्यावर पसरले. खालून जाणाऱ्या मार्गाव ही केमिकल पसरले.
लग्न होत नव्हते म्हणून शरद पवारांना दिली जीवे मारण्याची धमकी; तपासात धक्कादायक माहिती उघड
या अपघाताबाबत अजून एक नवीन अपडेट समोर आली आहे. या अपघातामध्ये रस्त्याखालून स्थानिक वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यावरून जाणारी मायलेकरे होरपळली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पेटते पेट्रोल अंगावर पडल्याने महिला आणि तिची दोन मुले भाजली आहेत.
बिग ब्रेकिंग! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठी दुर्घटना, टँकरला लागली भीषण आग
हे ही पाहा