औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे (Due to return rains) आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा हातातोंडाला आलेला घास हिरावून गेला आहे. दरम्यान अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे औरंगाबा द(Aurangabad) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत उद्धव ठाकरे (Udhav Thackreay) यांनी शेतकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान यावेळी शेतकऱ्यांना (Farmers) धीर देत उद्धव ठाकरे म्हणाले की, ” मी कायम तुमच्यासोबत आहे. शेतकऱ्यांनी संघटित व्हायला हवं . शेतकऱ्यांनो तुम्ही सुडाने पेटून उठा. तुमचा आवाज बनून सरकारसमोर जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रस्ताव समोर ठेवेल” असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
मोठी बातमी! अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली…
उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना शेतकरी म्हणाले की, “आम्ही कर्ज काढून शेतात पीक घेतली. पण पावसाने आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आम्ही वर्षभर केलेलं कष्ट, मेहनत या पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली. दरम्यान जे मंत्री संत्री पिकाची पाहणी करण्यासाठी येतात ते फक्त म्हणतात पंचनामे करणार मग तुम्हाला पैसे मिळणार.”
तसेच तिथे जमलेल्या शेतकऱ्यांमधून एका तरुण शेतकाऱ्याने आपली व्यथा उद्धव ठाकरेंसमोर मांडली. यावेळी तो तरुण शेतकरी म्हणाला की ,” मी एक तरुण शेतकरी आहे. मी बँक आणि सावकरांकडून कर्ज काढून शेती केलीय. आण मी त्या नोटिसला घाबरात नाही ओ. पण जे शेतकरी माझ्यासाठी जामीनदार झालेत ते मला त्रास देत आहेत. बँकवाले त्रास देत आहेत. मग माझ्यासारखा तरुण शेतकरी कशाला जगेल. तो आत्महत्या केल्याशिवाय राहणारच नाही.” असं यावेळी तरुण शेतकऱ्याने सांगितलं आहे.
Urfi Javed: उर्फीने चक्क फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस केला परिधान, पाहा VIDEO
उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेत शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरनंतर हा पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे हा दौरा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठीच केला असल्याने, सत्ताधारी नेते त्यांना घेरण्याचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे.
रुग्णालयात घडला धक्कादायक प्रकार, दोन नर्सेसने तरुणांना केली बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल