राज्यात सध्या मेगा पोलीस भरती सुरू आहे. विविध जिल्ह्यातील केंद्रांवर भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दरम्यान मुंबई पोलीस ( Mumbai Police) दलातील भरती प्रक्रियेत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सुरू असलेल्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत एका तरुणाला चक्कर आली. यावेळी या तरुणाचा जागीच मृत्यु झाला आहे. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी या उमेदवाराचे निधन झाले आहे.
नाशिकची हिंद केसरी थाळी राज्यात प्रसिद्ध; आस्वाद घेण्यासाठी होते खवय्यांची गर्दी
मुंबई पोलीस दलात 1 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे. यासाठी हजाराहून अधिक उमेदवार मैदानात उतरले आहेत. दरम्यान ही भरती प्रक्रिया सुरू असताना गणेश उगले या तरुणाचा शुक्रवारी (दि. 17) मृत्यु झाला आहे. 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण करून अंतिम रेषेवरून पुढे येताच हा तरुण खाली कोसळला.
शिवजन्मोत्सव: ‘परी’चा नववारी भरजरी अंदाज, मायरा वायकुळचे लेटेस्ट फोटो पाहिले का?
यावेळी या तरुणाचा जागीच मृत्यु झाला. गणेश उगले याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र अजूनही गणेशच्या मृत्यूचे ( Death) कारण स्पष्ट झालेले नाही. गणेश उगले हा मूळचा वाशीम जिल्ह्यातील असून तो आपल्या मित्रांसोबत तो या भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता. गणेशच्या अचानक झालेल्या मृत्युने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.
“…म्हणून अमित शाहांनी कसबा चिंचवड मध्ये प्रचार केला नाही; रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट चर्चेत