प्रेम प्रकरणातून बरेच चुकीचे प्रकार होण्याच्या घटना आजकाल घडत आहे. दिल्ली येथील श्रद्धा व आफताब चे प्रकरण ताजे असतानाच औरंगाबाद मध्ये देखील एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून ( One sided love) स्वतःला पेटवून घेत तरुणीला मिठी मारली. हा प्रकार औरंगाबाद ( Ayrangabad crime) येथील विद्यापीठ लेणी परिसरात घडला आहे.
चक्क गॅसवर मिळते 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण; वाचा सविस्तर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने विद्यापीठ लेणी परिसरातील शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था याठिकाणी हा प्रकार केला आहे. तो याच विज्ञान संस्थेत प्राणीशास्त्र ( Zoology) विभागात संशोधन करतो. तर संबंधित तरुणी जीवभौतिकशास्त्र विभागात संशोधन करते. मागील काही दिवसांपासून हा तरुण या तरुणीचा पाठलाग करत होता. यासंबंधी या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. सोमवारी दुपारी ही तरुणी एका प्राध्यापिकेला भेटण्यासाठी संस्थेत येताच, गजाननने स्वतःवर पेट्रोल टाकत त्या तरुणीच्या अंगावर सुद्धा पेट्रोल टाकले. नंतर स्वतःला पेटवून घेत त्याने तरुणीला मिठी मारली.
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच हावलदाराला मारहाण; व्हिडिओ होतोय व्हायरल
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे तरुणीने घाबरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्याम दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आनंदाची बातमी! कापसाला मिळतोय चांगला भाव; आणखी दर वाढण्याची शक्यता