Mumbai Local । मुंबई : मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local Train) ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे, दररोज लाखो लोक ट्रेनमधून प्रवास करत असतात. त्यामुळे दररोज ट्रेनमध्ये (Local Train) प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना नेहमीच लोकलमध्ये बसण्यासाठी धावपळ करावी लागते. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत काही ना काही सुविधा आणत असते. रेल्वेचे काही नियमही आहेत. परंतु काही प्रवासी त्याचे उल्लंघन करतात. (Latest Marathi News)
प्रवाशांनीच अनेकदा नियमाचे उल्लंघन केल्याने त्यांचे जीव धोक्यात येतात. बऱ्याचवेळा रेल्वे पोलीस (RPF) स्वतःच्या प्राणाची बाजी देत या प्रवाशांना वाचवतात. याबाबतचे व्हिडिओदेखील खूप व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण प्लॅटफॉर्म येण्यापूर्वीच उडी मारताना दिसत आहे.
पहा व्हायरल व्हिडिओ
Dear Sir/Madam,
— Jaswant Singh (@Jaswant55804218) September 7, 2023
Please take action against this person hanging in Local Train. From kurla to Mankhurd. pic.twitter.com/SHqMNGfTqN
अलीकडच्या काळात तरुणाईमध्ये जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा त्यांचे हे स्टंट त्यांना खूप महागात पडतात. मुंबई लोकल ट्रेनमधील एक एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण ट्रेनच्या बाहेर दरवाजाचा खांब धरून फूटबोर्डखाली लटकताना दिसत आहे. त्याने ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच धावत्या ट्रेनमधून खाली उडी मारली.
Breaking News । माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पहाटे झोपेत असतानाच अटक
सुदैवाने या ट्रेनचा वेग कमी होता. नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मुंबई विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. इथून पुढे असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनीही जीवघेणे स्टंट करू नये, असे देखील सांगण्यात आले आहे.