फौजी म्हंटल की, वर्दीतला एखादा रुबाबदार तरुण नजरेसमोर येतो. परंतु, निफाड तालुक्यातील एका मुलीने प्रचंड जिद्दीने ही वर्दी मिळवली होती. गायत्री जाधव (Gayatri Jadhav) नाव असलेली ही 23 वर्षीय तरुणी निफाड तालुक्यातील पहिली व नाशिक जिल्ह्यातील दुसरी आर्मी मध्ये जाणारी मुलगी होती. दुर्दैवाने नुकताच तिचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी! 12 डिसेंबर पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरु?
गायत्री जाधव ही शेतात मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या एका सर्वसामान्य घरातील मुलगी होती. आईसोबत रोजगार करत तिने आपले शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षणानंतर स्टाफ सिलेक्शनची परीक्षा ( Staff Selection Exam) देऊन ती जिद्दीने सशस्त्र सीमा दलात फौजी म्हणून सामील झाली होती.
बिग ब्रेकिंग! विक्रम गोखलेंच्या तब्बेतीत सुधारणा
सशस्त्र सीमा दलात निवड झाल्यानंतर गायत्री अलवर राजस्थान येथे प्रशिक्षणासाठी गेली होती. तेव्हा सरावादरम्यान तिचा अपघात ( Accident During Training) झाला होता. यानंतर तब्बल दहा महिने गायत्रीवर उपचार सुरू होते. परंतु, मंगळवारी ( दि. 22) तिने अखेरचा श्वास घेतला.
बिग ब्रेकिंग! विक्रम गोखलेंच्या तब्बेतीत सुधारणा
कष्ट आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करणाऱ्या गायत्रीच्या अशा जाण्याने तिचे संपूर्ण कुटुंब खचले आहे. तिच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. आधीच तिच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे त्यात हे आणखी एक संकट ओढावल्याने गायत्रीचे घरचे हतबल झाले आहेत. यामुळे त्यांनी सरकारने काहितरी मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय