
प्रामाणिक मेहनत आणि सातत्य या गोष्टींचा जोरावर माणूस काहीही करू शकतो. सोलापूरमधल्या एका तरुणाने आपल्या कामातून हे दाखवून दिले आहे. इंजिनिअर असलेल्या या तरुणाने वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी गाडीचा एक पार्ट बनवला आहे. ( part of vehicle) त्याच्या या कामाची दखल जगप्रसिद्ध टाटा कंपनीने ( Tata company) घेतली आहे.
सिमकार्डबाबत समोर आली मोठी अपडेट! एका आयडीवर मिळणार फक्त ‘इतके’ सिमकार्ड; लवकरच येणार नवीन नियम
राहुल बऱ्हाणपुरे असे या हुशार तरुणाचे नाव आहे. राहुलने बनवलेल्या गाडीच्या पार्टचे पेटंट ( Petant) टाटा कंपनीने (Tata Motors) घेतले असून त्यासाठी कंपनीने तब्बल साडे तेरा कोटी मोजले आहेत. यामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात राहुलच्या कामाचे कौतुक होत आहे.
सावधान! दुपारची झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; होतात ‘हे’ गंभीर आजार
राहुलने खूप दिवस अभ्यास आणि संशोधन करून चार चाकी गाड्यांमधील प्रदूषणाची ( Pollution) तीव्रता कमी करण्यासाठी पार्ट बनवला. इंडियन स्टॅंडर्ड नॉर्म्स नुसार हा पार्ट बनवला गेला आहे. या पार्टबाबतची माहिती राहुलने पोर्टलवर प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अनेक कंपन्यांनी राहुल सोबत पेटंट साठी संपर्क साधला. यामध्ये टाटा कंपनीचा सुद्धा समावेश होता.
HSC & SSC Results | ‘या’ दिवशी लागणार दहावी बारावीचा निकाल
राहुल बऱ्हाणपूरेने बनवलेल्या पार्ट मध्ये इंटरेस्ट दाखवत टाटा कंपनीने त्या पार्टचे पेटंट घेतलं आहे. राहुलने सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात एम.सी.व्ही.सी ऑटोमोबाईलचे शिक्षण घेतले आहे. त्याची घरची परिस्थिती देखील बेताची आहे. एकेकाळी तो खासगी गॅरेजमध्ये दुचाकी आणि चारचाकी दुरुस्तीचे काम सुध्दा करत होता. मात्र आज मेहनतीने त्याने यश मिळवले आहे.
LIC ची सरल पेन्शन योजना! वर्षाला मिळणार एक लाखांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या सविस्तर..