आळे फाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 15 नोव्हेंबर रोजी रात्री 2.30 च्या सुमारास आनंदवाडी डोंगरेमळा येथे सुदाम डोंगरे, रा. डोंगरेमळा आनंदवाडी, आणे, ता. जुन्नर, जि. पुणे यांच्या राहत्या घरी, सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील 16 हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असे 4.44 लाख रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. दरम्यान हे दरोडेखोर दरोडा टाकून पळून गेले.
मोफत रेशनबाबतचा नवीन नियम देशभर लागू! सरकारने सुरू केली ‘ही’ सुविधा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामधील दोन दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. त्यातील एक दरोडेखोर श्रीगोंदा तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय उंबर काळे, रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर व विश्वजीत रामेश्वर सानप, रा. देहू, तालुका हवेली, जिल्हा पुणे, या दोन दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.
जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा
पोलीस पथकाने या दरोड्याच्या गुन्ह्यांचा तात्काळ छडा लावून दोन दरोडेखोऱ्यांना अटक केली आहे. आता या प्रकरणाचं यापुढील तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे.