आधारकार्ड ( Aadhar Card) हे महत्त्वाचे कागदपत्र समजले जाते. शाळेतील प्रवेश घेण्यापासून ते बँकेचे व्यवहार पूर्ण करण्यापर्यंत सर्व कामांना आधार कार्ड लागते. आधारकार्ड वर आपले नाव, पत्ता,जन्मतारीख व फोन नंबर अशी वैयक्तिक माहिती ( Personal Imformation) असते. मात्र बऱ्याचदा आधारकार्डवरील ही माहिती चुकलेली असते. यामुळे अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
आधार कार्डवरील वैयक्तिक माहिती बदलायची म्हंटल की त्यासाठी ग्राहक सेवा केंद्रात जाऊन वेळ घालवने लोकांना कटकटीचे वाटते. मात्र हे काम तुम्ही घरच्या घरी ऑनलाइन पद्धतीने सुद्धा करू शकता. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर आधार कार्ड वरील वैयक्तिक माहिती बदलता येते. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
गौतम गंभीरला पाहून चाहत्यांनी ‘कोहली-कोहली’ जयघोष सुरू केला; पाहा Video
सर्वप्रथम UIDAI च्या https://uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यामध्ये ‘माय आधार’ वर जाऊन ‘अपडेट आधार’ या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन यावर जा. येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीन वरील सुरक्षा कोड टाकावा लागेल. याठिकाणी तुम्हाला ‘OTP पाठवा’ वर क्लिक करावे लागेल.
खुशखबर! आता व्हॉट्सअपवर मिळणार १० लाखांपर्यंतचे कर्ज; कस ते घ्या जाणून…
यावेळी तुमच्या मोबाईल क्रमांकावर वन टाइम पासवर्ड येईल. यानंतर स्क्रीन वर दिसणाऱ्या रकान्यात हा OTP टाका आणि login करा. याठिकाणी आता तुम्ही हवे ते बदल करू शकता. मात्र ज्या गोष्टी बदलणार आहात त्याचे सत्यता पडताळणारे पुरावे तुम्हाला स्कॅन करावे लागतील. दरम्यान तुम्ही केलेले बदल पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.
गांजाच्या नियंत्रित शेतीसाठी प्रयत्न सुरू; ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय…
येथे स्क्रीनवर येणाऱ्या लिस्टमधून BPO सर्व्हिस पर्याय निवडा. BPO तुमची माहिती व्हेरिफाय करतील. यानंतर अपडेट विनंतीची पुष्टी करत बदल सबमिट करा. विनंती सबमिट झाली की तुम्हाला URN मिळेल. नंतरच्या काळात URN वरून तुम्ही तुमची विनंती ट्रॅक करू शकता.
Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला