मुंबई : बॉलिवूड आमीर खान नेहमी त्याचा अभिनय आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. दरम्यान आता आमीर चर्चेचा विषय ठरण्याच कारण म्हणजे ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट.या चित्रपटामुळे आमीर खान चांगलाच वादात सापडला होता.त्यामुळे आमीर खानने प्रोडक्शन या ट्वीटर अकाऊंटवरून ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासंदर्भात माफी मागितलेला एक व्हिडीओ सोशल शेअर केला होता.दरम्यान आता आमीर खान बाबतीत एक आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आली आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत 15 दिवसांत भूमिका मांडा, अन्यथा…
आमीर खानने रात्री उशीरा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाबाबत माफी मागितलेला एक व्हिडीओ शेअर केला होता. परंतु तो व्हिडीओ त्याने लगेच डिलीट देखील केला. आमीर खानच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर आमीर खानवर पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात येत आहे.परंतु या व्हिडीओमध्ये कोणताही आवाज किंवा आमीरचा चेहरा दिसत नव्हता.या व्हिडीओतील काही स्क्रिनशॉर्ट समोर आले आहेत. त्यांपैकी एकामध्ये लिहिलंय की, आपण सगळे माणसं आहोत आणि चुका माणसांकडूनच होतात.
दुसऱ्या एकामध्ये लिहिल होतं की, कधी बोलण्याने, कधी माझ्या वागण्याने, कधी नकळत, कधी रागामध्ये, कधी मस्करीमध्ये जर मी कोणाचे मन दुखावले असेल तर मी तुमची माफी मागतो. ‘मिच्छामी दुक्कडम’ या सोबतच हात जोडायची इमोजी सुद्धा पाठवली होती.खरंतर, हा व्हिडीओला मिच्छामी दुक्कडमच्या निमित्ताने शेअर करण्यात आलं होतं. हे कळत-नकळत झालेल्या चुकांची माफी मागण्याचा दिवस आहे.