सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पारस या ठिकाणी बाबूजी महाराज मंदिरावरील टिन शेडवर झाड कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार? चंद्रकांत पाटील यांनी केले सूचक वक्तव्य…
या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले आहेत आता जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटना घडली अशी की, पारस या ठिकाणी बाबूजी महाराज मंदिरामध्ये आरती सुरु होती यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक १०० वर्ष जून झाड कोसळलं. हे झाड कोसळल्यामुळे ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अयोध्येत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर तुफान फटकेबाजी; मोठी घोषणा करून दिला धक्का
या घटनेची माहिती मिळताच मंदिर परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. त्याचबरोबर गावातील नागरिक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत होते. रात्रभर आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. माहितीनुसार, रात्रभर मंदिर परिसरात आक्रोश आणि रडारड सुरू होती.
आदनींसोबतच्या फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले,”कोणत्या अंडरवर्ल्ड डॉनसोबत….”