आपण नेहमी गायीचे,म्हैशीचे आणि फार फार तर बकरीचे दूध पितो. पण तुम्ही कधी गाढवाचे दूध पिले आहे का ? हो, बरोबर वाचताय तुम्ही ! आम्ही गाढवाच्याच दूधाबद्दल बोलतोय. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटू शकते. परंतु, बहुतांश देशांमध्ये गाढवाचे पालन केले जाते आणि मोठया किंमतीत त्याचे दूध विकले जाते.
देशातील पहिली कार कोणी खरेदी केली होती, हे तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर…
खरंतर प्राण्यांमध्ये गाढव ( Donckey) हा निरुपयोगी प्राणी मानला जातो. बऱ्याचदा माल वाहतूक करण्यासाठी गाढवाचा वापर केला जातो. मात्र, गाढवाचे दूध अतिशय महागडे व फायदेशीर असते. त्याच्या प्रतिलीटर दुधाची किंमत 5 ते 7 हजार रुपये इतकी असते.
राखी सावंतच्या आयुष्यावर येणार सिनेमा; चित्रपटाचे नाव वाचून तुमच्याही भुवया उंचावतील
महाराष्ट्राच्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यामधील चिमूर तालुक्याच्या गाव खेड्यांमध्ये तर दररोज सकाळी 100 रुपयांमध्ये 25 मिली गाढवाचे दूध विकले जाते. यावेळी गाढवाच्या गळ्यात स्पीकर लावून दूध विक्रेते दूध विकण्यासाठी येतात. सकाळच्या वेळेत लोक या दुधाचा आस्वाद घेतात.
“अन् तेव्हा श्रद्धा कपूरने नाकारली होती सलमान खानच्या सिनेमात काम करण्याची संधी”; वाचा खरे कारण
गाढवाच्या दुधात प्रोटीन आणि चरबीचे प्रमाण कमी असते. मात्र यामध्ये लॅक्टोज (Lactose) जास्त असते. विविध सौंदर्यप्रसाधने आणि औषधी उद्योगात सुद्धा याचा वापर केला जातो. गाढवाच्या दुधात पेशी बरे करण्याचे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे गुणधर्म आहेत. म्हणून गाढवाचे दूध फायदेशीर मानले जाते.
हृतिक रोशन लवकरच अडकणार विवाहबंधनात? लग्नानंतर राहण्यासाठी घेतले नवीन घर