कोल्हापूर: आपण दररोज सोशल मीडियावर आगळे-वेगळे व्हिडिओ पाहतो, अजब गजब गोष्टी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यामध्ये काही गोष्टी गंमतीशिर असतात तर काही थक्क करणाऱ्या असतात. दरम्यान या गोष्टी मोठ्या चर्चेचा विषय ठरतात. अशातच कोल्हापूरची (kolhapur) एक कोंबडी चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे.
‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत
चर्चेचं विशेष कारण म्हणजे या कोंबडीने सर्वात मोठं अंड (Egg) दिलयं. ही कोंबडी (Hen) कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे गावातील आहे. या गावातील दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमधील कोंबडीचे अंड आहे. सध्या या अंड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका, मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरातील कोंबडीने दिले देशातील सर्वात मोठे अंडं..#कोंबडी #kolhapur pic.twitter.com/tk8k3x6w0M
— Nikita Jangale (@NikitaJangale2) October 18, 2022
महत्वाची बाब म्हणजे हे अंड केवळ कोल्हापूर किंवा महाराष्ट्रामधल मोठ अंड नाही. तर चक्क देशातील सर्वात मोठं अडं आहे, असा दावा केला जात आहे. दरम्यान या अंड्याचं वजन तब्बल 210 ग्रॅम इतकं आहे. दरम्यान सामान्यपणे कोंबडीच्या अंड्याचं वजन 70-75 ग्रॅमपर्यंत असतं. त्यामुळे या अंड्याचं वजन ऐकून सर्वांना धक्का बसेल. इतकंच नाही तर आता हे अंड सर्वांचेच लक्ष वेधत आहे. सोशल मीडियावर नेटकरी या कोंबडीवर आणि अंड्यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
मुसळधार पावसाने पुण्यात घातला राडा, पाण्यात अडकलेल्या 12 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका