
Crime News । पुणे : सध्या गुन्ह्यांमध्ये (Crime) वाढ होत आहे. वाढती गुन्हेगारी पाहता प्रशासनाचा गुन्हेगारांना (Criminals) कसलाच धाक राहिला नाही अशा चर्चा सुरु आहेत. परंतु यामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. चक्क सासऱ्याने आपल्या जावयाचे अपहरण (Abduction) केले आहे. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुणे शहरातील आहे. विनोद साहेबराव आडे यांनी याबाबत येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. ते नोकरीसाठी आपल्या पत्नी आणि एका वर्षाच्या मुलीसह येरवडामध्ये राहत आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे सोन्याचे मंगळसूत्र मागितले. तिची समजूत काढूनही तिने हट्ट सोडला नाही. यातून त्यांच्यात पुन्हा ३ सप्टेंबरला वाद झाला. (Pune Crime News)
लगेचच तिने आपल्या माहेरी फोन करून विनोद मारहाण करत आहेत असे सांगितले. यानंतर विनोद यांच्या सासऱ्यांसह इतर नातेवाईक बीडवरुन पुण्यात आले. त्यांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत टाकले आणि त्यांना बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी नेले. तेथे त्यांना मारहाण करत विनोद आडे यांची जमीन पत्नीच्या नावावर करण्यास सांगितले. ३ दिवस गोठ्यात बांधून ठेवल्यानंतर त्यांना सहा सप्टेंबरला सोडून दिले. त्यानंतर विनोद आडे यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Congress । काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला शिंदे गटामध्ये प्रवेश