Site icon e लोकहित | Marathi News

Abdul Sattar । गौतमीच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांकडून थेट शिवीगाळ! व्हिडिओ व्हायरल

Abdul Sattar

Abdul Sattar । गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम हा नेहमी चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची चर्चा होताना दिसत आहे. या चर्चेचा विषय म्हणजे अब्दुल सत्तार. मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीच टीकेची धूळ उठते. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार हे नेटकऱ्यांच्या निशाणावर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

Navi Mumbai Fire । मुंबईत अग्नितांडव! केमिकल कंपनीला भीषण आग

१ जानेवारीला अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री महोदय यांनी सिल्लोड शहरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचा आयोजन केलं होतं. यावेळी गौतमीचा कार्यक्रम सुरू होताच तरुणांनी नेहमीप्रमाणेच हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रम मध्येच बंद पडला यावेळी अब्दुल सत्तार तरुणांवर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Sushma Andhare । ब्रेकिंग! ठाकरे गटाला मोठा धक्का; सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल

कार्यक्रम बंद होताच अब्दुल सत्तार स्टेजवर गेले माईक खातात घेतला आणि हुल्लडबाज तरुणांवर लाठीमार करा असे आदेश त्यांनी थेट पोलिसांना दिले. एवढेच नाही तर त्यांनी भर स्टेजवरून तरुणांना शिवीगाळ देखील केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आता अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करत आहेत.

Arvind Kejriwal । मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अटक होणार?

Spread the love
Exit mobile version