
मुंबई : काल मुंबई हायकोर्टात दसरा मेळावा संदर्भात सुनावणी करून, शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायची परवानगी दिली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे. शिंदे गटातील नेत्यांकडून ठाकरे गटाला लक्ष्य केलं जातंय. अशातच न्यायालयाने ठाकरे गटाला का परवानगी दिली?, यामागचा खुलासा अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) यांनी केला आहे.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का! वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर आता ‘ही’ दिग्गज कंपनीनीही होणार स्थलांतरीत
अब्दुल सत्तार म्हणाले, शिवाजी पार्कमध्ये मैदान मिळावे यासाठी ठाकरे गटाने आमच्या आधी अर्ज केला होता. त्यामुळं शिवाजीपार्क (Shivaji Park) मैदान त्यांना मिळाले असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगतिले आहे. अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. आमचाही दसरा मेळावा मुंबईतल्या ‘बिकेसी’वर होणार आहे व त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच आवाज घुमणार आहे. असे देखील ते म्हणाले.
अल्पभूधारक शेतकऱ्याने ‘अशी’ केली कमाल, पावने दोन एकरामध्ये मिळवले तब्बल 22 लाखाचे उत्पन्न
तसेच, 5 तारखेला मुंबईतील (Mumbai) बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. ती इतिहासात न होणारी सभा राहणार असल्याचं सत्तार म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले की,आम्ही सरकार सोडून बाहेर गेलो. तेव्हा मुंबईत येऊन दाखवा, असं शिवसेनेनं (Shivsena) म्हटलं होतं. तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब म्हणत होते या पोकळ धमक्या आहेत. मी एकटा जातो राज्यपाल यांची भेट घेतो.