
मुंबई : टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरण चांगलच चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक जणांची नावे समोर आली आहेत. अशातच टीईटी प्रकरणात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचं नाव समोर आल्याचं पाहायला मिळतंय.मंत्रीमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येलाच ही माहिती समोर आली आहे.त्यामुळे अब्दुल सत्तारांना मंत्रीपद मिळते की नाही याबाबत गोंधळ निर्माण होता. अशातच आता निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी आता न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.शिवाय याप्रकरणाचा चौकशीचा अहवाल 60 दिवसांमध्ये सादर करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तार हे शिंदे सरकरामधील आहेत. सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्याातील सिल्लोड मतदार संघाचे नेतृत्व करतात. मात्र, निवडणुकीदरम्यान त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती भरली नसल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली
यांनी याचिका दाखल केली होती.याप्रकरणी सिल्लोड प्रथमवर्ग न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Eknath Shinde: मराठा आरक्षणाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्याची नोकरीसंदर्भात महत्वाची घोषणा; म्हणाले…
तसेच सत्तार यांनी काही माहिती ही लपवून ठेवल्याचा आरोप देखील महेश शंकरपेल्ली यांनी केला होता.चौकशीचे आदेश यापूर्वीही देण्यात आले होते. पण झालेल्या तपासाबाबत तक्रारदार हे समाधानी नव्हते. त्यामुळे त्यांनी पुन्हा चैकशी करण्यात यावाी अशी मागणी केली होती.त्यामुळे आता असून लवकरच ही माहिती सादर करावी लागणार आहे.
Eknath Shinde: “हो.. मी कंत्राटीच मुख्यमंत्री, पण…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदेंच जशाच तस उत्तर