गायरानसाठी राखीव असलेल्या जमिनीचा ताबा खासगी व्यक्तींच्या नावे करण्याचा आदेश दिल्याने अब्दुल सत्तार अडचणीत

Abdul Sattar in trouble after ordering the possession of land reserved for Gayran in the name of private individuals

काही दिवसांपूर्वी जोमात असलेला शिंदे गट हळूहळू कोमात जातोय कारण, शिंदे गटातील नेते एका पाठोपाठ एक अडचणीत येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) जमीन घोटाळ्यात अडकले आहेत. वाशीम जिल्ह्यातील गायरानसाठी राखीव असलेल्या जमिनीचा ताबा खासगी व्यक्तींच्या नावे करण्याचा आदेश दिल्या कारणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना नोटीस बजावली आहे.

तुनिषाच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट समोर; गरोदर असण्याबाबत मोठा खुलासा

वाशिम जिल्ह्यातील गायरानचे ( Gayran Land) एक प्रकरण मागील अनेक वर्षांपासून कोर्टात सुरू आहे. यामध्ये योगेश खंडारे यांनी 37 एकर जमिनीचा ताबा आपल्याला मिळावा म्हणून मागणी केली होती. परंतु, स्थानिक न्यायालयात याबाबतचा अपील फेटाळण्यात आला. जिल्हा न्यायालयात देखील असेच झाले. यावेळी खंडारे यांचा या जमिनीवर कुठलाही हक्क नसताना ते जमीन हडपण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असे न्यायालयाने म्हंटले होते.

मुलांना चॉकलेट वाटणाऱ्या सांताक्लॉजला लोकांनी केली बेदम मारहाण

दरम्यान अब्दुल सत्तार यांनी जमिनीचा ताबा योगेश खंडारे यांना मिळावा यासाठी आदेश दिल्याने हे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध ठोस पुरावे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा न्यायालयाचा आदेश माहीत असूनही सत्तार यांनी आदेश दिले. यामुळे न्यायालयासोबतच राज्यसरकारच्या जीआरची ( Government GR) देखील पायमल्ली झाली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *