Abdul Sattar: विद्यार्थांना शाळेत पाचवीपासून शिकवले जाणार शेतीचे धडे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मोठा निर्णय

Abdul Sattar: Students will be taught agriculture lessons in school from class V, Agriculture Minister Abdul Sattar's big decision

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतीविषयक एक महत्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकार तरुणांना शेतीत निपुन करण्याच्या उद्देशाने एक धोरण राबवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थांना (students) नांगर धरण्यापासून अधुनिक शेतीचं प्रशिक्षण (Agricultural training) शिक्षकांना देण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांना शेतीचे ट्रेनिंग देण्याची जी रचना आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कानावर घालू आणि जर त्यांना हा निर्णय पटला तर मग ते शिक्षणमंत्र्याला आदेश देतील असे सत्तार यावेळी म्हणाले. महत्वाचं म्हणजे यासर्वाचा खर्च कृषी मंत्रालयाने द्यायचा की शिक्षणमंत्रलयाने याची बैठक होईल. अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.

Aurangabad: “गावात फोर व्हिलर आणा व 51 हजार रुपये बक्षीस मिळवा”, औरंगाबाद जिल्ह्यात गावकऱ्यांची अजब ऑफर

नेमक प्रशिक्षणात काय असेल?

आपल्याला माहीत आहे शेतीत अनेक छोटे मोठे प्रकार असतात. यामध्ये गायींना चारा कसा द्यायचा, नांगर कसा धरायचा
अशा अनेक गोष्टी असतात. या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिकवल्या तर याचे भविष्यात परिणाम चांगले असू शकतात. या गोष्टी नाही शिकवल्या आण विद्यार्थ्यांना नोकरी नाही मिळाली तर त्यांना शेतीदेखील करता येत नाही. जर त्याला लहानपणापासून शेती कशी करावी याचे जर शिक्षकांना ट्रेनिंग दिले तर शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देईल,अस अब्दुल सत्तार म्हणाले.

आता ‘या’ रेशनकार्ड धारकांवर केंद्र सरकार करणार कारवाई, वाचा नवीन नियम

मुख्यमंत्र्याच्या मंजुरिशिवाय काही मिळत नाही

पुढे अब्दुल सत्तार म्हणाले की, विद्यार्थ्याला पाचवी ते बारावी असे सात वर्ष शेतीचे शिक्षण दिले जाईल. पुढे सत्तार म्हणाले की माझ्या मनात असणं म्हणजे ही गोष्ट फायनल नसते. तसेच मी कोणता निर्णय जाहीर केलेला नाही पण मी मागणी करत आहे. तसेच मुख्यमंत्र्याच्या मंजुरिशिवाय काही मिळत नाही. पण मुख्यमंत्र्यांसोबत एकदा चर्चा झाली आहे. दरम्यान याचा प्रस्ताव लवकरच ठेवण्यात येईल आणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ अस अब्दुल सत्तार म्हणाले.

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर, असा असेल दौरा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *