Abdul Sattar VS Hemant Patil । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात आपल्याला नेहमीच नाराजी आणि खडाजंगी कायमच दिसून येत असते. सध्या देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. आता एकाच पक्षातील मंत्री आणि खासदार यांच्यात शिवीगाळ आणि खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे.
Sharad Mohol Video । शरद मोहळच्या हत्येचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर
शिवसेनेचे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या ऑनलाइन बैठकीमध्ये दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर हेमंत पाटील हे हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत.
हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली होती. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चक्क शिवीगाळ केली आहे. याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे.
Sharad Mohol | ब्रेकिंग! शरद मोहोळच्या हत्येमागील खरा मास्टर माईंड समोर; पोलिसांनी दिली माहिती