Satara Loksabha । सातारा : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha) राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती (Mahavikas Aghadi vs Mahayuti) अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यात दोन मोठे पक्ष फुटल्याने जनता कोणाला निवडून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच साताऱ्यात देखील कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे.
सातारा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. (Udayanraje Bhosale vs Abhijeet Bichukle)
“देशाचे संविधान वाचविण्यासाठी आपण ही लोकसभेची निवडणूक लढणार आहे”, असे अभिजीत बिचुकले यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महायुतीकडून उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी दिली जाईल असा शब्द केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिला आहे. पण या मतदारसंघात उमेदवार कोणताही असला तरी येथे कडवी टक्कर होणार? हे जवळपास निश्चित आहे.
Devendra Fadnavis । निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव, शरद पवारांना दिला मोठा धक्का