
‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale of ‘Bigg Boss’ fame) त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. यांनतर ते खूपच चर्चेत आले होते. आता त्यांनी एक आगळीवेगळी मागणी केली आहे त्यामुळे ते सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
सलमान खानला पाहताच नेटकरी म्हणाले, “आमचा हिरो आता म्हतारा दिसू लागलाय”
कसबा पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे निवडणूक रद्द करण्यात यावी, याची माहिती देणारं पत्र देखील सादर केलं आहे.
“ती दाढीपण जाळून टाकू”, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान
बिचुकले यांनी म्हटलं की, भाजपने पैसे वाट्ल्याचा दावा करत काँग्रेसच्या उमेदवारांनी आज सकाळी आंदोलन केले, पैशाचं वाटप सुरु असल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे असा दावा देखील अभिजित बिचुकले यांनी केला आहे. त्यामुळे मी तिसरा उमेदवार म्हणून मलाही न्याय हक्कानं लढणं हा माझा अधिकार आहे. या तक्रारींची दखल घेऊन त्याविरोधात निवडणूक आयोगानं संबंधितांवर कारवाई केली आहे का? असा असा प्रश्न देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे जर निवडणूक आयोगाला यावर कारवाई करायला जमत नसेल तर ही निवडणूक प्रक्रिया ठप्प करा आणि नव्यानं निवडणूक घ्या. असं बिचुकले यांनी म्हंटल आहे.