
‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale of ‘Bigg Boss’ fame) त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. यांनतर ते खूपच चर्चेत आले आहेत.
मोठी बातमी! गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक; समोर आली मोठी अपडेट
सध्या ते पुन्हा वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. पुण्यामधील कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मिशन न वापरता मतपत्रिका वापराव्या, अशी आगळीवेगळी मागणी अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या मागणीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
ठाकरेंच्या चुकीमुळेच शिवसेना व पक्षचिन्ह शिंदे गटाकडे; निवडणूक आयोग म्हणाले की, “त्यांनी….”
त्याचबरोबर अभिजित बिचुकले म्हणाले, जर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य नाही केली तर येत्या २० फेब्रुवारीपासून निवडणूक अधिकारांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार. असा इशारा देखील निवडणूक आयोगाला (Election Commission) अभिजित बिचुकले यांनी दिला आहे.