Site icon e लोकहित | Marathi News

अभिजित बिचुकले ठरले फुसका बॉम्ब! पडली अवघी चार मते

Abhijit Bichukle became a bubble bomb! Only four votes were cast

मागील काही दिवसांत पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे वारे वाहत होते. दरम्यान आज या निवडणूकीचा निकाल लागला असून कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) हे विजयी ठरले आहेत. याठिकाणी भाजपच्या हेमंत रासने ( Hemant Rasne) यांचा पराभव झाला असून या निकालाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

ज्याच काम दमदार तोच आमदार! ब्राम्हण केंद्रित पेठांमध्येच भाजपला मोठा धक्का

खरंतर कसबा मतदारसंघातील ( Kasba Vidhansabha) निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर व भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यामुळे रंगात आली होती. परंतु, अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले ( Abhijeet Bichukale) यांनी सुद्धा या पोटनिवडणूकित रंगत आणली.

पराभव होताच हेमंत रासने यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या पराभवाला जबाबदार…”

मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अभिजित बिचुकले यांनी कसबा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीचा निकाल आता लागला असून यामध्ये धंगेकर यांना 72 हजार 599 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना 61 हजार 140 मते मिळाली आहेत.

कसब्याचा निकाल ऐकून अजित पवार म्हणाले, “माझी स्थिती आता कभी खुशी कभी गम…”

मात्र या निवडणुकीत अभिजित बिचुकले यांना अवघी चार मते मिळाली आहेत. अगदी दोन आकडी मते मिळवण्यात सुद्धा अयशस्वी ठरल्यानंतर अभिजित बिचुकले यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आपण मोठ्या मताधिक्याने निवडणूक येऊ अस म्हणणारे बिचुकले निवडणूकित तोंडावर आपटल्याने त्यांची चर्चा सुरू असून त्यांचे मिम्स देखील व्हायरल होत आहेत.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसब्यातून रवींद्र धंगेकरांचा विजय

Spread the love
Exit mobile version